वर्षश्राद्ध हा केवळ एक विधी नाही — तो पितृांच्या स्मृतीला जपण्याचा भावनिक पवित्रा आहे. Varsha Shraddha Message in Marathi शोधत असाल, तर हे समजून घ्या: हे संदेश फक्त शब्द नसतात, तर आई-वडिलांच्या पायाशी ठेवलेल्या कृतज्ञतेच्या फुले असतात! या लेखात, आम्ही सादर करतोय तुमच्यासाठी: सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी साधे पण हृदयस्पर्शी मराठी शुभेच्छा, व्हॉट्सऍप स्टेटसवर टाकण्यासाठी भावपूर्ण वाक्ये, किंवा कुटुंबियांसोबत सामायिक करण्यासाठी Pratham Punyasmaran in Marathi मधील पहिल्या श्राद्धाच्या भावुक आठवणी.

आम्ही निवडले आहेत मराठीतील साधेपणा — ज्यात आहे ‘आजीच्या हातातल्या फुलांसारखी’ शुद्ध भावना आणि ‘बाबांच्या आठवणीतल्या’ निरागस प्रेमाचा ओलावा. कारण, श्राद्ध म्हणजे फक्त कर्मकांड नाही — ते पिढ्यान्पिढ्यांच्या प्रेमाचा ओघ आहे. येथे तुम्हाला सापडतील वर्ष श्राद्ध मराठी मेसेज ते प्रथम पुण्यस्मरणाच्या सुंदर शब्दांपर्यंत — प्रत्येक वाक्य, पितृांच्या आत्म्याला शांतता देण्याचा एक प्रयत्न 🙏🪔.
Varsha Shraddha Message In Marathi | वर्ष श्राद्ध मराठी मेसेज
चंदनापरी देह झिजविला
कष्टातून संसार फुलवला
उरली नाही साथ तुमची आम्हास
आठवण येते क्षणक्षणाला
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
शोधूनही सापडत नाहीये
म्हटल्यावर
खरंच फार दूर गेलेत हे स्वीकारावं.
प्रथम पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण श्रद्धांजलि
तो आनंदी चेहरा नाही कोणा दुखवले
मनाचा होता मोठेपणा नाही जमला कधी खोटेपणा
सर्वांना जवळ केले पाहता पाहता दूर देशी निघून गेले
तुप्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली
अपार कष्ट सोसले स्वसुख भोगायचे राहून गेले
थोरा मोठ्यांना जीव लावला
सर्वांच्या कल्याणासाठी देह झिजविला
आता उरली नाही साथ आम्हाला
वाट पाहतो तुमची यावे पुन्हा जन्माला
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
Pratham Punyasmaran In Marathi

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी..
सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
Also Read : Bhavpurna Shradhanjali In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हास नेईन..
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!
सूर्याप्रमाणे प्रकाश दिला सर्वास
अनेक सुखे घालून पदरात
दुखे कवटाळून उरात तेजोमय
जीवन यात्रा संपवली एका क्षणात
अनेक सुखे असूनही पदरी
आम्ही पाडतो अंधारात
आपल्या चरणी आम्हा
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला
आमचे प्रिय ….. यांना भावपूर्ण श्रद्धांजलि
प्रेम देऊनी जगाला जवळ केले सर्वांना
न उरली साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला
कल्पनेतही नव्हते तुमचे जाणे अधुरे राहिले जीवन गाणे
आता फक्त एकच उरले तुमच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहणे
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
Punyatithi In Marathi
“आपले निघून जाणे म्हणजे आम्ही पोरके होणे”!
आपली शिकवण आणि आपली आठवण आमच्या मनात चिरंतन तेवत राहील.
आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला
त्यांच्या अश्या अचानक जाण्याने
आम्ही सारे पोरके झाले आहोत
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
चिरशांती देवो हीच प्रार्थना
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही
Also Read : Sunderkand PDF in Hind – सम्पूर्ण सुंदरकांड पाठ
पवित्र तुमची स्मृती
चिरंतन तुमची माया
नित्य असूद्या आमची वरती
अखंड तुमची छाया
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
चंदनापरी देह झिजविला
कष्टातून संसार फुलवला
उरली नाही साथ तुमची आम्हास
आठवण येते क्षणक्षणाला
अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
Shok Sandesh In Marathi
आपली शिकवण… हीच आठवण
आता सहवास जरी नसला तरी
स्मृति सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
शुन्यामधूनी विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवूनी
लोभ माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर झाला तुम्ही जीवनी
जशी वेळ निघून जाईल
तशी जखम सुद्धा भरून येईल
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या
आठवणींना कुठलीच तोड नाही
त्यांच्या आठवणींचे झरे इतके की
साखरही गोड नाही
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
एक दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भाव सुमनांची ओंजळ भरुनी
वाहतो आम्ही श्रद्धांजली
Varsha Shraddha Quotes In Marathi
अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुझे अचानक जाणे
आजही घुमतो स्वर तुझा कानी
वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी
क्षणो क्षणी आता आमच्या मनी
तुमचीच आठवण येत आहे
हृदयात साठवलेल्या आठवणींना आता
अश्रुद्वारे वाट मोकळी होत आहे
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
पवित्र तुमची स्मृती
चिरंतन तुमची माया
नित्य असूद्या आमची वरती
अखंड तुमची छाया
प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन
पवित्र स्मृतींची ज्योत तेवते
अखंड आमच्या मनी
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी अस्तित्व,दिव्य,तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली
प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन
RIP Message In Marathi
मुठीत मावल्या नाही उधळून गेल्यात स्मृती
इंद्रधनुष्याचे सारे रंग दाखवून गेल्या स्मृती
जाणीव नेणिवेच्या पलीकडे भेटवून गेल्या स्मृती
तोल ढळता ढळता सावरून गेल्या स्मृती
समोर सावलीशी दिसली बावरून गेल्या स्मृती
तमाची छाया घनदाट उजळून गेल्या स्मृती
वियोगाचा वणवा उरी पेटवून गेल्या स्मृती
ती शेज शरांची होती जगवून गेल्या स्मृती
कोमजले होते आत काही, उमलून गेल्या स्मृती
साथ कधीही सोडणार नाही सांगून गेल्या स्मृती
प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन
प्रेम देऊनी जगाला जवळ केले सर्वांना
न उरली साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला
कल्पनेतही नव्हते तुमचे जाणे अधुरे राहिले जीवन गाणे
आता फक्त एकच उरले तुमच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहणे
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
प्रेमळ होतास तु
विसरेल कसे कुणी
मनात येतात दाटूनी
सदैव तुझ्या आठवणी
आत्म्यास शांती लाभो
हीच प्रभू चरणी विनवणी
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल
चालता बोलता देव तुम्हास नेईन
माणुसकी,स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही
अथक प्रयत्नांनी माणसं घडवली तुम्ही
सर्वांच्या ह्रदयावर राज्य केले तुम्ही
माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही
म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात तुम्ही
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
शुन्यामधूनी विश्व निर्मुनी
किती सुगंधी वृक्ष फुलवूनी
लोभ माया, प्रीती देवूनी
सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर झाला तुम्ही जीवनी
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
हसता हसता रडवलस
रडता रडता फसवलस
फूल उमलण्याअगोदर कळी गेली सुकून
का रागावलास आमच्यावर असा मधेच गेला सोडून
हृदयात आमच्या कायम तुमचे अस्तित्व राहील
तुम्ही परत येणार नसला तरी
आम्ही तुमची वाट पाहतच राहू
प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
Tags : varsha shraddha message in marathi,pratham punyasmaran in marathi,punyatithi in marathi,shok sandesh in marathi,varsha shraddha quotes in marathi