Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi : राजमाता जिजाऊ म्हणजे मातृत्वाची शक्ती आणि स्वराज्य स्थापनेचं प्रेरणास्त्रोत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याला घडवणाऱ्या जिजाऊंचं कर्तृत्व आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. 12 जानेवारीला साजरी होणारी जिजाऊ जयंती हा दिवस त्यांची शिकवण आणि विचारांचा प्रसार करण्याचा महत्वाचा दिवस आहे.
या दिवशी राजमाता जिजाऊंच्या बलिदान, धैर्य, आणि मार्गदर्शनाला मानाचा मुजरा करताना प्रेरणादायी सुविचार शेअर करण्याची परंपरा आहे. या ब्लॉगमध्ये आम्ही जिजाऊंच्या जयंतीसाठी खास मराठी कोट्सची संग्रहणा केली आहे. चला, त्यांच्या विचारांना आपल्या शब्दांमध्ये सामावून प्रेरणेचा हा दीप पुढे नेत राहूया!
Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi
जननी मराठा साम्राज्याची,
सारूनी बाजूस राजघराणी.
जनतेच्या साऱ्या न्यायाखातर,
लढा लढविली ही रणरागिणी.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ
मुजरा माझा माता जिजाऊंना,
जिने घडविले शुर शिवबाला.
साक्षात होती ती आई भवानी,
जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!
राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ!
स्वराज्याचा जिने घडविला विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ
जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले
श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईं यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
स्वराज्याचा जिने घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता !!
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा,
सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने,
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
धन्य ती माता जिजाबाई
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज
धन्य धन्य ते स्वराज…
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!
मुजरा माझा माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला
साक्षात होती ती आई भवानी
जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
जिजाऊ तुम्ही नसत्या तर,
नसते झाले शिवराय नी शंभु छावा
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा
जिजाऊ तुम्ही नसत्या तर,
नसते लढले मावळे
जिजाऊ तुम्ही नसत्या तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या
राजमाता जिजाऊ
माँसाहेब यांना जयंतीनिमित्त
कोटी कोटी वंदन आणि मानाचा मुजरा !
अखंड स्वातंत्र्याची प्रेरणा
राजमाता जिजाऊ मांसाहेबांना
जयंतीदिनी त्रिवार मुजरा !
Also Read : Rani Laxmibai Information In Marathi | झाशीची राणी माहिती
Rajmata Jijau Jayanti Banner





Rajmata Jijau Jayanti Date
राजमाता जिजाऊ जयंती दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते.
ही तारीख राजमाता जिजाबाई भोसले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून पाळली जाते. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र) येथे झाला होता.
Rajmata Jijau Jayanti Bhashan
Jijamata Speech In Marathi | जिजाऊ भाषण 1
Jijamata Information In Marathi Speech | जिजाऊ भाषण 2
Jijamata Bhashan Marathi | जिजाऊ भाषण 3