50+ Nag Panchami Marathi Wishes | नाग पंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Marathi Wishes | नाग पंचमीच्या शुभेच्छा : नाग पंचमी हा सण आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. नाग पंचमीचा सण भारतीय जनतेच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा प्रतीक आहे. सणाच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा केली जाते आणि त्यांच्या आराधनेतून निसर्गाची आणि पर्यावरणाची रक्षा करण्याचा संदेश दिला जातो.

नाग पंचमीच्या या पवित्र दिवशी, आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश आहेत. “नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! आपले जीवन आनंदाने भरून जावो, आणि आपल्याला सदैव आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होवो.” किंवा “नाग पंचमीच्या मंगलमय दिवशी, नागदेवतेचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असोत. आपले जीवन आनंदाने आणि सुखाने भरून राहो.” अशा या शुभेच्छा संदेशांनी सणाचा आनंद द्विगुणित करता येतो.

आपल्या सणासुदीचे दिवस हे फक्त उत्सवाच्या साजश्रींगाराचा भाग नाही, तर ते आपल्या संस्कृतीच्या जतनाचा आणि परंपरेचा उत्सव आहेत. नाग पंचमीच्या दिवशी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी, आणि आरोग्याची प्रार्थना करणे हे आपल्या संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. “नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! आपले जीवन सदैव सुख, समृद्धी आणि शांतीने भरलेले राहो.” अशा शुभेच्छा संदेशांनी आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करा.

Nag Panchami Marathi Wishes | नाग पंचमीच्या शुभेच्छा

श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी,
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले
तो दिवस म्हणजे नागपंचमी…
नागपंचमीच्या शुभेच्छा

nag panchami quotes in marathi​
nag panchami quotes in marathi​

भगवान शंकराची कृपा झाली,
सखेसवे मी नागपूजनाला निघाली…
नागपंचमीच्या शुभेच्छा

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी

नागदेवतेच्या शुभार्शिवादाने तुमच्या घरात सुख,
समृद्धीची बरसात कायम होत राहो…
नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Wishes In Marathi

वारूळाला जाऊया,
नागोबाला पुजूया…
नागपंचमीच्या शुभेच्छा

nagpanchami wishes in marathi
nagpanchami wishes in marathi

नागपंममीचा सण आला,
पर्जन्यराजाला आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा,
घेतला हाती हिरवा शेला…
नागपंचमीच्या शुभेच्छा

मुखाने ओम नम: शिवाय म्हणा
आणि नागदेवताची पूजा करा…
हॅपी नागपंचमी

शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची
पूजा करण्याचा आज दिवस…
नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा

Also Read : Nag Panchami Information | नागपंचमी माहिती मराठीत

Nag Panchami Quotes In Marathi

सण नागपंचमी सया निघाल्या
वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

nag panchami wishes in marathi
nag panchami wishes in marathi

देवांचा देव महादेवाला जो प्रिय,
भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार…
नागपंचमीच्या शुभेच्छा

जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा

सण नागपंचमी सया निघाल्या
वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Nag Panchami Message In Marathi

मान ठेवू नागराजाचा,
पूजा करू शिवशंकराची…
नागपंचमीच्या शुभेच्छा

nag panchami images in marathi
nag panchami images in marathi

हर हर महादेव…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे…
नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे…
नागपंचमीच्या शुभेच्छा

कधी भेटशील तेव्हा,
व्हतील तरे भेटी गाठी,
येत्या नागपंचमीला आणीन तुला दुधाची वाटी…
नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला अर्पण करा
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…
नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Funny Quotes In Marathi

डूख धरून बसणाऱ्या
सर्व मानवरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Marathi Wishes
Nag Panchami Marathi Wishes

त्या सर्व नागिणींना,
नागपंचमीच्या शुभेच्छा ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या आयुष्यात विष कालवलं आहे.

मनुष्यप्राणी इतका मुर्ख नागपंचमीला खोट्या नागाला पूजतो,
पण घरातील त्या नागिणीची पूजा करत नाही जी त्याच्यावर दररोज फणा काढते.

प्रत्येक गोष्टीत विष पेरणाऱ्या
माणूसरूपी नागांनापण नागपंचमीच्या शुभेच्छा!

फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा देऊन झाल्या असतील
तर नागनागिणीसारख्या मित्रमैत्रिणींना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊ या!!!

आज नागपंचमी आहे घरातील
सर्व विवाहित पुरूषांनी पत्नीला
दूध आणि जिलेभीचा नैवेद्य द्यावा.

बायकोच्या नुसत्या
डोळ्यांच्या इशाऱ्यावर
डुलणाऱ्या सर्व
नागोबांना नागपंचमीच्या शुभेच्छा

माझ्यावर डूख धरून बसलेल्या
सर्व मानवरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा!!!

प्रत्येकाच्या आयुष्यात एक नागिणरूपी बहीण असते,
जी घरी आल्यावर आईवडिलांसमोर तुमच्याबद्दल विष ओकते.

दुसऱ्यांच्या आयुष्यात विषप्रयोग करून
स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसलेल्या
माणूसरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा…

सकाळपासून फक्त दूधच पित बसणार की
आज ऑफिसचं काम पण करणार…
नागपंचमीच्या शुभेच्छा!!!

Also Read : Shetkari Instagram Bio Marathi | शेतकरी इंस्टाग्राम बायो

Nag Panchami Shubhechha Marathi

आपल्या मध्येच राहीन आपल्याला फणा
दाखवून फुस करणाऱ्या नागांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा

दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून
स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना
पण नागपंचमीच्या शुभेच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण…
नागपंचमीच्या शुभेच्छा

मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या शुभेच्छा

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे नागपंचमी

पंचमीचा सण आला पंचमीचा सण आला
प्रिय भाऊ राया मला माहेरी न्यायला आहे आला

फाद्यांवरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,
पंचमीचा सण आला माहेरच्या आठवणीने डोळे झाले ओले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close
Scroll to Top