Heart Touching Birthday Wishes In Marathi

मनाला स्पर्शून जाणाऱ्या Heart Touching Birthday Wishes In Marathi​

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Heart Touching Birthday Wishes In Marathi​​ : वाढदिवस हा आपल्या जवळच्या व्यक्तींना आपली मायेची भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर प्रसंग असतो. हृदयाला स्पर्श करणाऱ्या शब्दांमध्ये असलेली जादू आपल्या शुभेच्छांना खास बनवते.

या ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासाठी मनाला भिडणाऱ्या, हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह तयार केला आहे, ज्या तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम भरतील. मराठी भाषेतील या सुंदर शुभेच्छा वाचून त्या व्यक्तीच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करा.

Heart Touching Birthday Wishes In Marathi​

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi

भाऊ तू माझ्यासाठी फक्त
भाऊ नाहीस तर एक प्रेरणा आहेस.
तुझ्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने
मी नेहमीच बलवान झालो आहे.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

Also Read : वाढदिवसाचे आभार संदेश | Birthday Thank You Message Marathi

भाऊ, तू माझ्या आयुष्यातील
एक अविभाज्य घटक आहेस.
तुझ्या साथीने प्रत्येक क्षण खास झाला आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझा भाऊ आहेस,
माझा मित्र आहेस,
माझा खांदा आहेस.
तुझ्या वाढदिवसानिमित्त
मनापासून शुभेच्छा भावा!

माझ्या जन्मापासून तू माझा
पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत
तूच माझा पहिला मित्र राहशील.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.
हीच चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि
देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.

नशीब लागत जीवापाड प्रेम
करणारा भाऊ मिळायला.
माझा लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎊🍰

तुम्ही मला नेहमी चांगली
व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे
माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.
🎊🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎊🎂

Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi

तुझे ते लपून माझ्याकडे बघणारे मनमोहक नयन 💕
सर्वात सुंदर गोष्ट जी मला आवडली ते तुझे सुंदर मन🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जान 🎂💑🎉

Also Read : Love Birthday Wishes In Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील !
Happy Birthday My Love

तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा !

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुझ्यासाठी जागा खूप आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…🎂🎉

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही,
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही…
अशा माझ्या प्रेयसीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Leave a Comment