Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi

दत्त जयंतीच्या शुभेच्छा | Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

दत्त जयंतीच्या शुभेच्छा | Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi : गुरुदेव दत्त जयंती हा भक्तांसाठी एक विशेष आध्यात्मिक दिवस आहे, जो भगवान दत्तात्रेय यांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. दत्तात्रेय हे ज्ञान, शांती, आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात आणि त्यांचे मार्गदर्शन भक्तांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देते. या दिवशी भक्तगण भगवान दत्तात्रेयांची पूजा करून त्यांना आपल्या श्रद्धेचा मान अर्पण करतात. आपल्या श्रद्धेला शब्दरूप देण्यासाठी खास दत्त जयंती कोट्स आणि सुविचारांची गरज भासते.

या ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायी आणि भक्तीभावाने भरलेल्या मराठी कोट्सची (Datta Jayanti Wishes In Marathi) एक खास संग्रहणा केली आहे. चला तर, या पवित्र दिवशी गुरुदेव दत्तांच्या विचारांचे स्मरण करून आपल्या जीवनाला सकारात्मकतेची दिशा देऊया!

Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi

अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा …!!

सकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!! – दिगंबरा दिगंबरा

नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

दिगंबरा दिगंबरा..
श्री दत्तगुरु दिगंबरा..
विश्वंभर औदुंबरा..
दयाघना हे करूणाकरा..!!

Shree Datta Jayanti quotes in Marathi
Shree Datta Jayanti quotes in Marathi

दत्त माऊली माझे आई,
पहिला ठाव घ्यावा बाई –
दिगंबरा दिगंबरा

दत्त जयंतीचा सुखकर आणि मंगलमय दिन आपणा सर्वांसाठी सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येवो!

दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा!

सर्वांना दत्त जयंतीच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा!

Datta Jayanti Wishes In Marathi

घेता तुझे नामा ठेविता मी माथा
जय गुरुनाथा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जपतो नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दे पाप मुक्ती सत्वर या पामरा – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भाव भक्ती ठेऊनी अंतःकरणी, लीन सदा तुझेच चरणी
अंतरीच्या माझ्या कर दूर ही व्यथा – जय गुरुनाथा

सर्व कणाकणांतही मिळे तुझे रूप,
तुझे नाम घेता विसरतो तहान भूक
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

जय गुरुनाथा, तूच या अभाग्याचा एकमेव त्राता – जय गुरुनाथा

Datta Jayanti Shubhechha In Marathi
Datta Jayanti Shubhechha In Marathi

भक्तांसाठी नेहमीच धावत येतात अवधूतचिंतन – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय
सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी
लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
श्री दत्तगुरु जयंतीच्या आपणास आणि
आपल्या परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!

Also Read : स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती | Swami Vivekananda Information In Marathi

दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी
दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti Status In Marathi

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना

निराकर गुरु गुरु रे निर्गुण
गुरु सृष्टीकर गुरु विश्वंभर, गुरु विन नोहे साधू मुनीजन – दत्त दिगंबर

वाणी असे मधुर, बुद्धी असे सतेज
चित्त असे एकाग्र, सद्गुरू दर्शन – दत्त दिगंबर

माणसाने माणसाला ‘माणूस’ म्हणून समजून घेतलं ना की अध्यात्माची खरी सुरूवात होते – दत्त दिगंबर

Datta Jayanti Status In Marathi
Datta Jayanti Status In Marathi

काही मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय
आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय – दत्तगुरू दत्तगुरू श्रीदत्तगुरू

स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा, शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

सृष्टीचे सर्जन,
अनोखे दर्शन,
त्रिमूर्तीस वंदन
गुरुदेव दत्त!

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलोपावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका – दत्त दिगंबर

Datta Jayanti Shubhechha In Marathi

अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त – दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

त्रिमूर्ती हा अवतार,
दत्तरूपी साकार,
त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर
होता साक्षात्कार घडतो चमत्कार,
गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार

ज्याच्या हृदयात गुरू मूर्ती,
त्याची होईल जगभरात किर्ती
जो करेल गुरूची पूजा,
त्याच्या आयुष्यातील दुःख होईल वजा – श्रीदत्त दिगंबरा

ज्याच्या मनी गुरू विचार,
तो नसे कधी लाचार
ज्याच्या अंगी गुरू भक्ती,
त्याला नाही कशाचीही भीती –
दत्तगुरू जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi
Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi

चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधूनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले,
मला हे दत्तगुरू दिसले – दत्त दिगंबर

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले – दत्तगुरू जयंतीच्या शुभेच्छा!

Also Read : संत निवृत्तिनाथ | Nivruttinath Maharaj Short Information Marathi

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!

Shree Datta Jayanti quotes in Marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर, आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

Datta Jayanti Wishes In Marathi
Datta Jayanti Wishes In Marathi

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा.

दत्तगुरू म्हणावे की स्वामी, समर्थ म्हणावे की नृसिंह सरस्वती
औदुंबर की कल्पतरू, दीन दुःखितांचा कैवारू

गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार – दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

Leave a Comment