ghatasthapana wishes in marathi

घटस्थापनेनिमित्त मंगलमय शुभेच्छा | Ghatasthapana Wishes In Marathi

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Ghatasthapana Wishes In Marathi : घटस्थापना हा नवरात्र उत्सवाचा प्रारंभ मानला जातो, जो देवी दुर्गेच्या उपासनेचा विशेष काळ आहे. या दिवशी घटाची स्थापना करून देवीची पूजा केली जाते आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण नऊ दिवस उपासना करतात. घटस्थापनेच्या मंगलमय दिवशी आपण आपल्या घरात आणि आयुष्यात देवीची कृपा प्राप्त करून, सुख, समृद्धी आणि शांतीचे स्वागत करू या. या विशेष प्रसंगी आपल्या प्रियजणांना प्रेमाने शुभेच्छा देण्यासाठी काही मनोहारी संदेश:

Ghatasthapana Wishes In Marathi

अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
घटस्थापनेच्या शुभेच्छा

कुमकुम लागल्या पावलांनी
आई जगदंबा येवो तुमच्या दारी
सुखसमृद्धी आणि असुर नाशिनी
देवी आहे संकट हारी..!
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा

घटस्थापनेच्या मंगलदिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

Also Read : घटस्थापना संपूर्ण माहिती | Ghatsthapna Information In Marathi

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा

आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

Ghatasthapana In Marathi

शरदात रंग तसे,
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

अश्विन शुद्ध पक्षी सिंहासनी विराजमान तू होते
भक्तांच्या संकटाच्या वेळी माते तू धावून येते
आधार वाटतो माते मला तुझ्या सदैव पाठी असण्याचा
नवरात्र सन तुझ्या भक्तांचा जागर करण्याचा
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा
घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा

कुठे दिसते तू कालिका म्हणूनी
कुठे असतेस तू दुर्गा
आनंद रक्तात भिनण्या उत्सवात होतेस तू शेरावाली
नवरात्रात पूजली जाते रूपे तुझी सगळी धारण केलेली
घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Ghatasthapana Quotes In Marathi

आजपासून सुरू होणा-या नवरात्र
आणि घटस्थापना ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता
आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो हीच
अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना

सर्व जग जिच्या शरणात आहे,
नमन त्या आईच्या चरणी आहे,
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ,
चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

Also Read : Marathi Charolya On Love | मराठी चारोळ्या

ज्या क्षणाची पाहत होतो वाट,
ती आली सिंहावर बैसोनी,
आता होईल प्रत्येक इच्छा पुरी,
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

Ghatasthapana In Marathi SMS

आई दुर्गा,
आई अंबे,
आई जगदंबे,
आई भवानी,
आई शितला,
आई वैष्णो,
आई चंडीका,
देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अपरंपार महिमा तुझा धावून येसी संकटाला
घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!

ती आहे जननी,
ती आहे कालिका.
जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित,
ती आहे आई दुर्गा.
घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा.

Ghatasthapana SMS In Marathi

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर देवी दुर्गेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो.
तुमच्या जीवनात आरोग्य,
आनंद आणि समृद्धी नांदो. घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा!

माँ दुर्गेच्या चरणी प्रार्थना की तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत
आणि यशाचा मार्ग उघडला जावो.
मंगल घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

या नवरात्रोत्सवात देवीचे आशीर्वाद मिळवून तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
सुख, समाधान आणि यशाचा अनुभव घेण्याचे दिवस आले आहेत.
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा!

माँ दुर्गेच्या उपासनेच्या या शुभ प्रसंगी,
तिचे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सदैव लाभोत.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

या घटस्थापनेला देवीच्या पूजेत मनसोक्त सहभागी होऊन, नवरात्राचा आनंद उत्साहात साजरा करा. देवी दुर्गेच्या कृपेने तुमच्या जीवनात सदैव मंगलमय परिवर्तन घडो, हीच शुभेच्छा!

Leave a Comment