Marathi Charolya On Love | मराठी चारोळ्या : marathi charolya, marathi charoli ,romantic marathi charolya , marathi charoli prem , marathi charoli on love , prem charolya
Marathi Charolya | मराठी चारोळ्या
ती म्हणते चंद्र ताऱ्यात हरवून जाऊ रात्ररात्र,
तुझा नि माझा श्वास एकच देह नाममात्र
कळीचं फुलनं हा तर तिचाच गुण
वेड्या कवींसाठी मात्र ती प्रेमाची खुण…
पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी कुणी छेडी तराणे…
कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद…
प्रेम माझ तुझ्यावरचं कोणत्याही
शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याची काहीच गरज भासणार नाही
संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत…
मनही काहिसं जुनचं
तेही नवी तार छेडतायत…
तुझ्या कुशीत येताना
माझ्या श्वासास वादळं उठतात
या वादळांना भिऊनच माझे डोळे मिटतात- चंद्रशेअर गोखले
तुझ्या नजरेत असेल काय?
प्रेमाच्या गावात स्वतःला विसरुन जावे अशी वेगळीशी नशा…
की नजरेतून प्रेमवाट शोधणारी मनाची वेडीशी आशा…
तुझा स्पर्श जाणवेल कसा ?
पहिल्या पावसाचा थेंब अंगावर झेलावा तसा…
की श्रावणातल्या वाऱ्याने अंगावर शहारा येतो एकदम तसा…
थोडं अंतर राहू दे
क्षणभर तुला डोळे भरुन पाहू दे- चंद्रशेखर गोखले
सखे
हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल…
अंधारातला काजवाही
तेव्हा सुर्यापेक्षा प्रखर असेल…
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेरपर्यंत,
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे,
तरीही न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रुप तुझा संग जागे मग लोचनी…
निरोप तुझा घेताना बघते मागे वळुनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरुनी…
निरोप तुझा घेताना मिटते मी पापणी
अंधार ही येई तेव्हा चेहेरा तुझाच घेऊनी…
निरोप तुझा घेताना पाऊस गातो गाणे
चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाते…
तुझ्यावर माझे प्रेम हे समुद्राच्या
रागासारखा आहे,
इतका शक्तिशाली आणि सखोल तो
कायमचा राहील
संध्याकाळची वेळ पुन्हा ही
निळी होऊनी नटते…
सुगंधित ही रातराणी
तुझ्याचसाठी सजते..
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठांवर आणता येत नाही
प्रेम हे असचं असतं
कारण शब्दात सांगता येत नाही
आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
णि आता तूझंच नाव येतयं
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत
पुन्हा त्या पाऊल वाटांवरती
वळू लागले माझे पाऊल
जिथे तू भेटली होती
आणि पावसाची झाली होती चाहूल
Marathi Charoli | मराठी चारोळी
गारठलेल्या सकाळी उंबरठा ओलांडून
एक प्रकाशाची लकेर माझ्या घरात आली
मग आठवलं…
तुला भेटण्याची वेळ जवळ आली
घेऊन मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलयं
आता तूच समजावं याला
क्षितीजाच्याही पलिकडे एस्वादी मैफिल जमावी,
अशी तू कधी-कधी तुझ्याही नकळत माझ्यात सामापतेस…
त्या सामावण्यालाही एक नाजुकसा गंथ असतो.
आणि त्या गंधाचाही गंध होऊन मग, तू माझ्या सभोवती दरवळतेस !
तू कविता असशील तक
मला शब्द बनायचं आहे
तुला मिळवायचं नाही तर
मला तुझे व्हायचे आहे
आलेली लाट विरुन तर जातेच पुन्हा त्याच सागरात
किनाऱ्यावर उरतात तेच कण भिजलेले, विस्कटलेले,
पुन्हा येणाऱ्या लाटेच्या प्रतिक्षेत नव्याने नटलेले
येणारी हर एक लाट अशी
Also Read : Best 500+ Love Quotes In Marathi
आठवणी येतात ……. !!
आठवणी बोलतात …… !!
आठवणी हसवतात …… !!
आठवणी रडवतात …… !!
काहीच न बोलता आठवणी
निघूनही जातात …….!!
तरी आयुष्यात शेवटी
आठवणीच राहतात …..
आता राहवेना मूळीच
कसे सांगू हे तुला ?…
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला…
रात्री जागून विचार करणं
प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं
प्रेम असतं
हातात हात धरुन चालणे
प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं
प्रेम असतं
झुळुक लाजरी येते अन् स्वप्न वेलीवर झूलते…
सांज सावळी येते अन् उगीच धडपड होते…
देना चाहूल सजनी आज भाव मनी हा दाटे…
येशील का तू सांग एकदा तुझवीन जगणे अधूरे वाटे…
वाट पाहशील तर आठवण
बनून येईन ,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन …..
एकदा मनापासून मला आठवून तर बघ
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन …..😄😃
ओझरता स्पर्श उमलती मनी चांदणफुले…
हळवी पाखरं नजरानजर आकाशझुले…
मिटताना घट्ट अलवार शब्द आनंदमळे…
मनी छनछन मलमली गान घुंगरवाळे…
सोनेरी पहाट हिरव्या रानात सपान निळे…
खरं प्रेम ते असतं
ज्यामध्ये तुमच्या सुखापेक्षा
समोरच्या व्यक्तिच्या सुखाचा
जास्त विचार असतो
Romantic Marathi Charolya | रोमॅंटिक मराठी चारोळ्या
एकटाच चालतो आहे आजवरी,
हात हाती घेशील का?
घेईन उंच भरारी तुजसवे
साथ मज देशील का?
गोड आनंदी आहेत
सहज हळुवार भावना आहेत
हळुवार भावना आहेत
मन अतुट प्रेम आहे
संपूर्ण अतुट प्रेम आहे
आता तू आहेस……..
जाणाऱ्या क्षणांना आता आठवावे, हसावे…
प्राजक्त भरल्या अंगणाशी, लटके रुसावे
छंदवेड्या आभाळाला नसावी कुठलाही गाज….
गंधवेड्या रानाशी, व्हावे मिलनाचे गुज !
तुझ्या एका हास्यासाठी
चंद्रसुद्धा जागतो,
रात्रभर तिष्ठत तो आभाळात थांबतो
तुला पाहून मन माझं
गगनझुल्यात झुलतं…
कारण
आख्ख आसमंत तेव्हा
तुझ्या नयनात फुलतं…
तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी
आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी
नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला
कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा
शब्द मुके होतात तेव्हा
नजर तुझी बोलते…
शब्दांची घागर भरते अन्
मनातले राज खोलते…
तुझ्यासाठी जीव देणारे
खूप जण भेटतील
पण माझ्यासारखा जीव लावणारी
कोणीही मिळणार नाही
भाषा प्रेमाची आज मला कळते आहे,
नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे…
दूर असुनही मन मनाशी जुळते आहे,
आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे…
तुझ्या कवेत मला
माझे आयुष्य सारे काढायचे आहे
तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे
तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ
तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ
Marathi Charoli On Love | प्रेमावरच्या मराठी चारोळी
क्षणिक हसते क्षणिक रुसते
तुझ्या प्रेमाची कट्यार काळजात घुसते…
हातात दे हात… नको समजू दिलासा
प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा…
प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा…
हजारो नाते असतील पण त्या,
हजार नात्यात
एक नाते असे असते
जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा
सोबत असतो तो म्हणजे ‘नवरा’
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती…
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती…
तुझ्या येण्याने माझे
आयुष्य झाले पुरे
तुझ्या येण्याने माझ्या
जगण्याला मिळाले अर्थ नवे
ती म्हणते चंद्र ताऱ्यांत हरवून जाऊ रात्ररात्र
तुझा नि माझा श्वास एकच देह मात्र नाममात्र
Also Read : मराठी प्रेम कविता
तो बोलायला लागला की,
मी हरवून जाते,
त्याच्याकडून माझी तारीफ ऐकताच
लाजेने गुलाबी होते
प्रकाशवेड्या रात्री…
नदीकिनारी पाण्यात पाय सोडून
आपलेच प्रतिबिंब पाहण्यात जेव्हा ती रमलि होती…
तेव्हा तिचे सौंदर्य पाहण्यासाठी
नभांगणी चंद्र, ताऱ्यांची मैफल जमली होती…
तुझी सोबत असताना,
जीवनात फक्त सुखांचीच,
अविरत बरसात असेल
प्रेम काय आहे माहीत नाही,
पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल
तर मला जन्मो जन्मी हवयं
हळूहळू हवेतला गारवा वाढतोय नव्या जोमाने…
अन् तिच्या प्रेमाचा गोडवा सुध्दा बहरतोय पुन्हा नव्याने…
चांदण्यात राहणारा मी नाही,
भीतींना पाहणारा मी नाही
तू असलीस नसलीस तरीही
शून्यात तुला विसरणारा मी नाही
प्रेम म्हटलं कि भेटणं आलं…
एकमेकांना खेटणं आलं…
समुद्रकिनारी…
तासन्तास हरवून स्वतःला…
एकमेकांत शोधणं आलं…
आकाशी हृद्याच्या उडती बेधुंद.
तुझ्या आठवांचे थवे….
अलगद मनाच्या क्षितीजावर वसते,
तुझ्याच प्रेमाचे एक गाव नवे….
प्रेम माझ तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात मावनार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याचीही गरज भासनार नाही.
तुला जेव्हा पण पाहतो,
फक्त पाहतच राहतो.
हसतेस नाजुकसं,
अन तू निघून जातेस.
मी मात्र तिथेच राहतो,
तुझ्या गालावरील खळीत हरवलेला
विखुरलयं मी माझं प्रेम,
तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….
लहरु दे नौका तुझ्याही भावनांची, स्वैर,
उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती….
खुप काही बोलायच होतं,
सारं मनातच राहिल….
तुझ्या डोळयात पाणी पाहुन,
माझंही मन भरभरुन वाहिल….
थंड सांजवारा,
असह्य दुरावा….
यत्न स्पर्शाचा,
तूही करावा….
Prem Charolya | प्रेम चारोळ्या
मनाच्या वहीत जपलय,
तुझ्या प्रेमाचं एक पान….
निर्भेळ प्रेम माझं,
डोळ्यांतून तू जाण….
डोळ्यांची भाषाच न्यारी,
शब्दांशिवाय सारं स्पष्ट मांडता येतं….
वेळ पडलीच तर आपल्यांसी,
न बोलताही भांडता येतं….
कधी वाटतं मनाला,
तुझ्या डोळ्यांतील अश्रूचा अर्थ व्हावं….
गालांवरती विरुन जाऊन,
आयुष्यही सार्थ व्हावं….
सदैव तू सोबत असावस,
आता मनाची गरज आहे….
डोळ्यांत पहा मग कळेल,
बोललेलं अगदी खरंच आहे….
मन माझं आहे तुझ्याकडेच,
हाती फक्त माझा हात घे…..
असेन सदैव मी तुझाच,
अन तुझ्याचसाठी सर्वकाही….
तूही मला जन्माची साथ दे….
असंच कधी तुला,
माझ्या आठवणींत,
हसताना बघायचं आहे….
जीवनाचं सुंदर स्वप्न मला,
आता तुझ्याचसोबत जगायचं आहे….
शब्दांच्या ओंजळी वाहिल्या तरी,
भावना सरत नाहीत…
असं का होतं मग ?
तेच तेच सांगायला शब्दच उरत नाहीत….
अल्लडशा कोण्या क्षणी,
तुझी माझी गळाभेट व्हावी….
तळमळणाऱ्या दोन हृदयांची भेट,
अगदी थेट व्हावी….
बघ कधी,
स्वतःच स्वतःला निरखून,
तूझ्या रुपात मी दिसेन….
हळूवार पापण्या मिटून घेशील,
तेव्हा जाणवेल तूला,
तूझ्यातच मी असेन….
तुझ्या डोळ्यांत कसा ना,
मी अलगद हरवतो….
तिथेच शोधून स्वतःला,
पुन्हा तिथेच हरविण्याचं मी ठरवतो…
पुन्हा त्या भावनानी,
मनातून ओथंबून वाहावं….
वेड्या माझ्या प्रेमपावसात,
तू चिंब चिंब भिजत राहावं…
ढगांच्या चाळणीतून,
अवचितच चांदवा धरतीस येतो….
त्याचवेळी कसा,
तूझ्या आठवांचा सागर,
माझ्या मनात भरतीस येतो….
माझ्यावरील तुझं प्रेम ते जीवापाड,
मला डोळाभर पाहूदे….
माझंही जाणायचं असेल तर,
माझ्या डोळ्यापल्याड तुझीही नजर जाऊदे….
चंद्रिकेस बिलगू पाहणारा,
तो चांद जसा…..
मी ही तुझाच,
तसाच काहीसा….
सायंकाळच्या हवेत पसरतोय,
धुंद गुलाबी गारवा….
माझ्या मनातही बहरतोय,
तुझ्या प्रेमाचा अर्थ एक नवा….
स्वप्न मीलनाचे रुजताना,
किनारे रेतरांगोळीत सजले होते….
काही तारेही नभात तेव्हा,
निखळण्यास धजले होते….
सांजेचे सारे रंग,
कसे माझ्यावरच भाळले….
प्रेमाचे फूल गुलाबी,
जेव्हा तूझ्या केसात मी माळले….
त्या गारव्याचा कण न कण,
नशा बनून,
माझ्या श्वासात भिनला आहे….
जणू तुझा श्वासच,
तो गारवा बनला आहे….