Navra Bayko Quotes In Marathi :- पती-पत्नीच्या नात्यात प्रेम व विश्वास असल्यास ते नाते यशस्वी मानले जाते. शरीराला जसा ऑक्सिजन आवश्यक आहे, (Navra Bayko Status Marathi) तसाच नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम असणे गरजेचे आहे. लग्नाच्या वेळी सात फेऱ्यांमध्ये ते एकमेकांना आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहण्याचे व एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात.(Husband Wife Quotes In Marathi) यशस्वी वैवाहिक जीवनासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
नवरा – बायकोच्या नात्यावरील काही हृदयस्पर्शी कोट्स (Husband Wife Relation Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी आम्ही या लेखातून देणार आहोत. हे नाते भावनिकरित्या अत्यंत महत्त्वाचे ठरते. तर नवऱ्यासाठीही काही खास कोट्स आपण पाठवतो. असेच नवरा बायकोच्या नात्यावरील काही खास भावनिक कोट्स (Navra Bayko Quotes) आणि बायकोसाठी प्रेमाच्या संदेशांचा वापर नक्कीच करू शकता.
Navra Bayko Quotes In Marathi
“नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या
माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल..”
डियर बायको,
तुला कोणत्याच गोष्टीसाठी
माझ्या होकाराची गरज नसते.
तू….अहो!! म्हटलंस तरी
पुरेसं असतं…!!
कधी आईच्या राज्यात
स्वयंपाक घरात न शिरलेली ‘ती ‘;
सासरी मात्र ‘बायको’ म्हणून
नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते..
प्रिय बायको,
मी ऑफिसला असल्यावर
माझी जास्त आठवण
काढत जाऊ नकोस.
माझ्याकडे पाण्याची
एकच बॉटल असते.!!
लग्नानंतर सगळ्या परिस्थिती सोबत
‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते.
त्यातही पतीचा साथ असेल तर ठीकच,
नाही तर ‘ती’ खचून जाते हो…💕
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
Navra Bayko Quotes In Marathi
नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण
महत्व द्यायला विसरते.. आणि
मित्रमैत्रिणीनां वाटतं
लग्नानंतर ‘ती’ बदलली.. 💕
तुझ्या हाताला चव आहे.
आणि तुझ्या ओठांनाही.
माहेरी बहीण भावा मध्ये सगळ्यात आधी
मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’;
सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
आई बाबांना खाण्यापिण्या पासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’;
सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही,
आई बाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..💕💕
आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे
माहेरी साधी सर्दी झाल्यावर
घर डोक्यावर घेणारी ‘ती’;
सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी
कुणाला जाणू देत नाही..💕
Also Read : Jokes In Marathi Navra Bayko – भाग ५
तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्या आधी💕
कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते,💕
कुणाची तरी बहीण असते,
कुणाची तरी हसत💕 खेळणारी मैत्रिण असते..
Navra Bayko Quotes In Marathi
नशिबाने जरी साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिली
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन दिशा मिळाली
नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ
‘फक्त💕 नवऱ्यासाठीच’ ‘ती’
एका अनोळख्या घरात जाते💕,💕
बाकी सासरची नाती
तर नंतर निर्माण होतात💕 हो..
तुझ्या केसात लावलेला तो फूल सुगंध
मनी भरतातच करी मला बेधुंद..!
नवरा आयुष्यभर “नवरा”च राहतो,
“नवरी मुलगी” मात्र “बायको” बनते.. 💕
तुझा क्युटसा फेस
आणि मोकळे केस
माझा अक्खा दिवस
बनवून टाकतात…
नवरा हा आभाळासारखा
स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,
जेणेकरून बायकोरूपी चंचल,
आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला
त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
तू रुसलीस की…
अजून सुंदर दिसतेस.
आणि तू वेडी मात्र
मेकपवर खर्च करतेस.
धडधड माझी तुझ्यामुळे आहे,
आशिकी माझी तुझ्यामुळे आहे
सांगू तर कसे सांगू ?
माझ्या जीवनाचा श्वासच तुझ्यामुळे आहे
तुझ्या माथ्यावरील बिंदी
तुझे सौंदर्य वाढवून देते
उफ, ये काजळाचे काळे
मला पुन्हा प्रेम करवून देते
Navra Bayko Quotes In Marathi
स्वतःच्या नावाची तुझे
नाव जोडायला लागलीये
स्वतःशीच मी आता
प्रेम करायला लागलीये..
रागावून जा कितीही पुन्हा पटवून घेऊ
दूर जा कितीही पुन्हा बोलावून घेऊ
मन आहे माझे सागराची रेती थोडी?
कोरून तुझे नाव कसे मिटवून देऊ?
माझ्या आजारी पडलेल्या मनाची औषध आहे तू
माझ्या जीवनात प्रेमाचा गोडवा निर्माण करणारे मध आहे तू
माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे
श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे
क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना
कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे
तू हळूच मारलेली मिठी
माझा थकवा दूर करते.
थकलेल्या मनाला…
क्षणात चूर करते..!!
चहाचा घोट…
आणि तुझा ओठ
गोड काय..?
नक्कीच तू…
तू घरी नसल्यावर
घर सुद्धा एकटं पडतं.
घरातलं किचन…
फुलांची बाग आणि
माझं मन…तुलाच शोधतं.!!
Husband Wife Quotes In Marathi
एवढ्या जगात मी तुलाच निवडलं
मग तूच ठरव तुझी किंमत काय असेल
नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना
तितकेच जास्त ते एकमेकांवर प्रेम करतात,
पटतंय का तुला?
नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ,
ती गाठ कधीही कुठेही कशीही जुळते
Also Read : Best 500+ Love Quotes In Marathi
तुझ्याशिवाय जगणं काय,
जगण्याचं स्वप्नंही पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय किमान काही क्षण जगता येतं,
पण तुझ्याशिवाय जगणं शक्यच नाही
तू म्हणजे माझा श्वास आहेस,
तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही.
तू नसतीस तर कदाचित मी इथपर्यंत पोहचूच शकलो नसतो
नवरा तर असा हवा,
ज्याला मी न बोलता माझ्या मनात काय आहे
ते समजेल असं मला नेहमी वाटायचं आणि
तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं हे स्वप्नं पूर्ण झालंय
Husband Wife Relation Quotes In Marathi
मिटल्या पापण्या तरी आपसूक जाणवेल सहवास,
डोळ्यात फक्त तू दिसणं महत्त्वाचं.
तुझ्यावर अतोनात प्रेम आहे आणि आजन्म राहील
आपलं नातं हे ओढूनताणून नाही
तर निर्मळ मनाने निर्माण झाले आहे,
त्यामुळे ते कधीच तुटणार नाही.
तुझ्याशिवाय माझं आयुष्य हे आयुष्यच राहणार नाही
नात्यामध्ये प्रेम निर्माण झाल्यावर,
ते नातं कधीच धोका देणार नाही
आणि आपलं नातं हे तसंच आहे
तुझ्या मिठीत जे सुख आहे ते सुख कशातच नाही.
तू जवळ नसल्यावर याची उणीव जाणवते.
तू आयुष्यभर साथ दे आणि सोबत राहा
अंधकारमय आयुष्यात अचानक तू आलीस
आणि सर्व काही बदलले. शुभ्र सहवास तुझा,
मन चांदण्यात न्हाले. सोबत तुझ्या जीवन अप्रतिम झाले
वडिलांनंतर जो आपली काळजी करतो आणि
कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देत नाही तो असतो नवरा.
तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी कायम देवाची ऋणी राहीन
हजारो नाती असतात,
पण आयुष्यभर साथ देते ते
महत्त्वाचे नाते म्हणजे नवरा – बायकोचे नाते
तू इतक्या प्रेमानं बघावं की नजरेनंही लाजावं.
मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगत आहे,
कारण तुझ्याशिवाय जगण्याला काही अर्थच नाहीये
Navra Bayko Quotes
माझ्याशिवाय तुला कुणी झेलू शकत नाही…
हा प्रत्येक बायकोचा नारा असायला हवा.
बायकोने I Love You म्हटल्यानंतर
I Love You too म्हणणं
तितकंच गरजेचे आहे जितकं,
जोर से बोलो, जय माता दी म्हणणं
लग्नानंतर I Love You पेक्षाही अधिक
परिणामकारक शब्द म्हणजे,
दे आज मी भांडी घासतो…
लग्नातील सर्वात मोठा विश्वासघात म्हणजे,
आमची मुलगी गाय आहे सांगून
नवऱ्याला वाघिण सोपवली जाते
अगदी परफेक्ट बायको कोणती?
तर जी कधी त्रास देत नाही,
आपल्याशी खोटं बोलत नाही,
कधी विश्वासघात करत नाही,
ना कधी शॉपिंगला जात,
पण हे कदाचित सर्व स्वप्नंच आहे
नवरा बायकोचं नातं म्हणजे,
दोघांसाठीही संकट पण तूच आणि
त्या संकटावरील इलाजही तूच
Navra Bayko Quotes
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात,
जे विष पितात, त्यांना महादेव म्हणतात
आणि जे विष आहे हे समजल्यानंतरही
प्यायल्यानंतर अमृत असल्यासारखे
वागतात त्यांना ‘पतिदेव’ असे म्हणतात
सर्वांना लग्न करायलाच हवे.
कारण आयुष्यात आनंदच सर्वकाही नसतो
गप्प बसणे हे कोणत्याही बायकोचे स्त्री धन आहे
आणि ते फक्त ती झोपतानाच घालते.
तुम्ही स्वतःला वाघ समजत असाल
तर पत्नीला शेरावाली माँ समजा.
अन्यथा तुम्हाला जगणं होईल मुश्किल
Navra Bayko Status Marathi
तुला पाहिलं की असं काहीसं होतं,
की माझं मन वेड्यासारखं तुझ्यामध्ये गुंततं
तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे
तुझा नवरा नाही तर तुझा श्वास बनून शेवट पर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे
आयुष्यात काही जण आपल्यासाठी खूप स्पेशल असतात.
माझ्यासाठी माझ्या आयुष्यात तुझ्याइतकं स्पेशल कोणीच नाहीये
कितीही संकटं आली तरीही तुझी साथ असेल
तर मी कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे
आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ अशीच राहू दे
आयुष्य खूप सुंदर आहे,
कारण माझ्या आयुष्यात तू आहेस सोबत
आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत
Navra Bayko Relationship Quotes In Marathi
कसं असतं ना,
प्रत्येकवेळी दुसऱ्याला समजून घेणारी
माणसंच जास्त दुखावली जातात.
कारण त्यांना गृहीत धरलं जातं
फक्त सांगायच्या गोष्टी असतात,
कोणीच कोणाचं दुःख समजून
घेऊ शकत नाही आणि हेच सत्य आहे
सोसण्याची सवय झाली की,
हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण
आपोआपच कमी होत जातं
वेदना कधीच कमी होत नाहीत,
मात्र त्या वेदनेसह आयुष्य जगायची सवय होऊन जाते.
ही सवय होते ती केवळ नात्यात मिळालेल्या वागणुकीमुळे
एकटेपणा तेव्हा वाटत नाही,
जेव्हा आपण एकटे असतो.
पण तेव्हा जाणवतो जेव्हा
आपली आवडती व्यक्ती
आपल्याला हवं असताना
आपल्यासोबत नसते
प्रेमात शंका आणि राग त्याच व्यक्ती व्यक्त करतात,
ज्यांना कोणाला तरी गमावण्याची भीती असते,
पण सतत शंका घेण्याने नात्यावर मात्र
परिणाम होतो हे विसरता कामा नये
माणूस गमावणं हे नक्कीच सर्वात मोठं नुकसान आहे.
मात्र त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे
त्या माणसाच्या आठवणीत आयुष्यभर जगणं होय
प्रेमाने जग जिंकता येतंही,
पण काही वेळा आपण ज्या व्यक्तीला जग मानतो,
त्या व्यक्तीला आपल्याला मात्र जिंकता येत नाही
कुणाला कितीही द्या,
कुणावर कितीही प्रेम करा,
पण कुठेतरी काहीतरी कमी पडतंच…
प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते.
एकमेकांना समजून घेतले तरच नातं टिकू शकतं.
मात्र ते टिकविण्यासाठी एकमेकांशी बोलणंही तितकंच गरजेचे आहे.